स. रा. गाडगीळ - लेख सूची

सेक्युलरिझम : प्रा. भोळे-पळशीकर यांना उत्तर

‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या संपादकांनी ‘धर्मनिरपेक्षता (सेक्युलरिझम) या विषयावर एक परिसंवाद घ्यावा या हेतूने प्रा. भा. ल. भोळे आणि श्री वसंत पळशीकर ह्या महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंतांकडून एक दहा कलमी प्रश्नावली तयार करून घेऊन एप्रिल १९९१ च्या अंकात प्रकाशित केली. अनेक लेखकांनी ह्या उपक्रमांला प्रतिसाद देऊन आपापले विचार मांडले. मीही गेली ३०-४० वर्षे सेक्युलरिझम ह्या विषयावर …

सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक तिसरा

डॉ. आंबेडकरांनी सेक्युलॅरिझमचा आशय अगदी योग्य शब्दात कसा स्पष्ट केला आहे ते यापूर्वी आपण पाहिले. परंतु हिंदू आणि मुसलमान या दोन धार्मिक गटांचा संघर्ष हाच सेक्युलरिझमवरील चर्चेचा मुख्य प्रश्न बनला आहे. प्रस्तुत परिसंवादात उपस्थित केलेले बरेचसे प्रश्न या संघर्षाच्या संदर्भातच निर्माण झालेले आहेत. “धर्माचरणाला जीवनमार्ग मानण्याची धारणा जेथे पक्की आहे अशा भारतीय समाजात धर्माचरण घराच्या …

सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक दुसरा

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सेक्युलर समाजनिर्मितीचे ध्येय स्वीकारले हे योग्यच झाले. भारतासारख्या बहुधर्मीय नागरिक असलेल्या देशात सेक्युलर मूल्यांवर आधारित शासनव्यवस्थाच यशस्वी होऊ शकते. परंतु त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी राजकीय स्वार्थासाठी जनतेच्या धर्मभावनेला आवाहन करून एकगठ्ठा मते मिळविण्याचा मोह आवरला पाहिजे आणि धार्मिक गढांचा अनुनय थांबविला पाहिजे. शासनाने अगदी निःपक्षपातीपणाने सेक्युलॅरिझमच्या मूलतत्त्वांची, तसेच भारतीय घटनेने स्वीकारलेल्या धर्मजातिनिरपेक्ष समान …

सेक्युलॅरिझम आणि भारत – लेखांक पहिला

एप्रिल १९९१ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात ‘धर्मनिरपेक्षता : काही प्रश्न‘ या विषयावरील परिसंवादासाठी काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्या संदर्भात प्रस्तुत लेख लिहीत आहे. प्रश्नावलीतील मुद्द्यांना तुटक तुटक उत्तरे देण्याऐवजी सेक्युलॅरिझम या संकल्पनेचा उद्गम कोणत्या परिस्थितीत झाला, या संकल्पनेचा मध्यवर्ती आशय कोणता, ही संकल्पना कोणत्या मागनि विकसित होत गेली आणि मुख्यतः भारतात तिला कोणते …